श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

कृतीच्या स्तरावर प्रयत्न न करता केवळ वाचन करून त्याविषयी भाष्य केल्यास विषयाच्या ज्ञानाने अहं वाढू शकतो. त्यामुळे बरेच प्रवचनकार, कीर्तनकार आणि सत्संग घेणारे यांच्यामध्ये अध्यात्म कृतीत न आणल्याने ज्ञानाचा तीव्र अहं निर्माण होतो.

सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

रावण श्रीरामाला तुच्छ वनवासी समजत असे. शेवटी ‘रावणाचे काय झाले ?’, हे तुम्ही जाणता. विजयादशमीनिमित्त श्रीरामाचे हे शौर्य आठवून त्यांना शरण जा. त्यातच तुमचे कल्याण आहे.

हिंदूंनो, विजयोपासनेद्वारे विजयोत्सवाकडे वाटचाल करूया !

विजयाचे केवळ स्मरण न करता या सर्वांनी विजय कसा संपादन केला, असुरांचे निर्दालन कसे केले, हे लक्षात घेऊन आपणही विजयोपासनेच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत !

‘रावणदहन करून त्याचा अवमान केला जातो’, असे सांगणार्‍यांनो, यामागील हिंदु धर्मशास्त्र लक्षात घ्या !

प्रभु श्रीरामाने अशा रावणाचा वध करून दृष्ट प्रवृत्तीचाच वध केला, याचे प्रतीक म्हणून रावणदहनाची परंपरा चालू आहे.

‘रामलीला’ आणि ‘रावणदहन’ या कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांनो, समाजातील बोकाळलेली रावणवृत्ती नष्ट होण्यासाठीही प्रयत्न करा !

सर्वत्र वाढणारी माजलेली रावणवृत्ती (दुष्ट वृत्ती) नष्ट होण्यासाठी प्रयत्न कधी करणार ? दुष्टांचा पराभव केल्यासच विजय होईल, हे लक्षात घेऊन कृतीशील व्हा !

प्रेम आणि सद्भावना निर्माण करणारी आपट्याची पाने !

लक्षावधी पानांनी लगडलेला आपट्याचा वृक्ष हा प्रतीकात्मकरित्या हिंदूंचा एक मोठा समूह आहे. हिंदू या वृक्षाप्रमाणे संघटित झाले, तर त्यांच्याकडे कुणीही वक्र दृष्टीने पाहू शकणार नाही.

ह्यूमस (सुपीक माती)

सुपीक मातीनिर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष लागवडीच्या ठिकाणी झाडांच्या मुळांजवळ पालापाचोळा इत्यादी विघटनशील पदार्थ कुजले तरच होते. ही प्रक्रिया कचरा कुजवण्याच्या डब्यात किंवा खड्ड्यात (कंपोस्ट बीनमध्ये) किंवा खतांच्या कारखान्यात होऊ शकत नाही.

सरकारी आदेशांकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारी शाळांना सुट्टी देणे, हे भारताला लज्जास्पद !

‘झारखंड, बंगाल, बिहार आदी राज्यांमध्ये सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत आहे.’

कधी काय म्हणायचे, हेही न कळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. त्यामुळे मी ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन. कायद्याने अशी बंधने घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले.