असा आदेश सर्व राज्यांनीही द्यावा !

कर्नाटक सरकारने ‘कोणत्याही पशूची हत्या करतांना त्याला बेशुद्ध करणे आवश्यक आहे’, असा आदेश दिला आहे. हलाल मांसाच्या वेळी प्राण्यांची गळ्याकडील नस कापून रक्तस्राव होऊन त्याची हत्या केली जाते. अशा हत्यांवर या आदेशामुळे बंदी येणार आहे.

काँग्रेसच्या राज्यातील असुरक्षित हिंदू !

गुढीपाडव्याच्या दिवशी करौली (राजस्थान) येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात ३५ जण घायाळ झाले.

ही मागणी तत्परतेने मान्य करा !

कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या मुसलमान आमदारांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.

ख्रिस्ती मिशनऱ्यांचे खरे स्वरूप जाणा !

कर्नाटकातील इराण्णा नागूर यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारांसाठी तमिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिस्ती मिशनरी रुग्णालयात माहिती विचारली असता तेथे त्यांना मुलावर विनामूल्य उपचारांसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले.

हिंदूंनी झटका मांसाचा उपयोग करावा !

‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.

हलाल मांसाविषयी हिंदूंमध्ये जागृती हवीच !

हलाल मांस हा एक ‘आर्थिक जिहाद’ आहे. ‘हलाल मांसच वापरावे’, असे त्यांना (मुसलमानांना) जेव्हा वाटते, तेव्हा ‘ते वापरू नका’, असे सांगण्यात अयोग्य काय आहे ?, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केला.

असे भारतात कधी होणार ?

सौदी अरेबियाच्या सरकारने मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा, तसेच केवळ ‘अजान’ (नमाजपठणाला बोलावण्यासाठी आवाहन करणे) आणि ‘इकामत’ (नमाजासाठी दुसऱ्यांदा आवाहन करणे) यांसाठी वापर करण्यात यावा, असा आदेश दिला आहे.

याविषयी निधर्मीवादी गप्प का ?

उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या राज्यातील कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

अशा घटना कधी थांबणार ?

कर्नाटक राज्यातील चिंचणी गावातील सरकारी शाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची, तर हरोहल्ली गावातील शाळेत असणार्‍या श्री सरस्वतीदेवी, म. गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्याही मूर्तींची तोडफोड करण्यात आली.

बंगालमध्ये लोकशाही आहे का ?

बीरभूम (बंगाल) येथे पोलिसांनी २०० हून अधिक गावठी बाँब जप्त केले आहेत. तसेच राज्यातील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील सालानपूरमध्ये पोलिसांनी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या संख्येने बाँब जप्त केले.