‘राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघा’च्या वतीने घरातील श्री गणेश आणि श्री महालक्ष्मी यांच्या सजावटीविषयी स्पर्धा !
राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील गणेशभक्तांसाठी घरातील श्री गणेशमूर्ती आणि श्री महालक्ष्मी यांच्या समोर केलेल्या सजावटीविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे यांनी दिली.