प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर धाडी !

प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या.

पुणे येथे ३० वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांना मतदान ओळखपत्र मिळाले नाही !

यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून विद्यार्थ्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा महायुतीचा आरोप !

महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची धमक नसल्यानेच महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांवर आरोप करत महायुतीच्या नेत्यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांना सुनावले.

पुणे येथे भरारी पथकाने केली ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन शासनाधीन !

पकडण्यात आलेली रक्कम एवढी आहे, तर जप्त न झालेली केवढी असेल ? निवडणूक म्हणजे पैसे वाटण्याची प्रक्रिया झाली आहे.

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विकणार्‍या दुकानदाराचे केले प्रबोधन !

मोशी (पिंपरी) येथील जलवाहिनीला गळती; सहस्रो लिटर पाणी वाया !

जलवाहिनीला गळती कशी लागते ? महापालिका प्रशासन वेळोवेळी तिची पडताळणी करत नाही का ?

नागपूर येथे एम्.बी.बी.एस्.चे ३५ टक्के विद्यार्थी अभ्यासामुळे तणावात !

तणाव-निर्मूलन करण्यासह नैतिक मूल्याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना देणे आवश्यक ! त्यातून त्यांना आत्मबळ प्राप्त होईल !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप . . . !

बोलोरो पिकअप परराज्यातील असतांना संशयित चालकाने खोटा वाहनक्रमांक लावून ती गाडी वापरली. ती गाडी स्वत:च्या नावावर करून घेतली.