नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील एम्.बी.बी.एस्.चे (‘बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी’चे) ३५ टक्के विद्यार्थी अभ्यासामुळे तणावात असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय शाखेच्या मानसोपचार विभागाने ही पहाणी केली होती. या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सकारात्मक रहाण्यासाठी मानसोपचार विभागाच्या वतीने समुपदेशन केले जाईल. जिम (व्यायामशाळा), योगासने, मैदानी खेळ, चालणे, तसेच ध्यान यांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका :तणाव-निर्मूलन करण्यासह नैतिक मूल्याचे शिक्षणही विद्यार्थ्यांना देणे आवश्यक ! त्यातून त्यांना आत्मबळ प्राप्त होईल ! |