मुंबई – येथील मंत्रालयात २२ जानेवारी या दिवशी महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत काढण्यात येणार आहे. याविषयी नगर विकास विभागाने अधिकृत पत्रक काढले आहे. त्यात महापौरपदाच्या प्रक्रियेची माहिती दिली आहे. ही सोडत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. ही सोडत चिठ्ठ्या टाकून काढली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे ध्वनीचित्रीकरणही केले जाऊ शकते. या वेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि इतर वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित रहातील.
आरक्षणाद्वारे निश्चित होणार असलेले प्रवर्ग !
१. अनुसूचित जाती (एस्सी) आणि अनुसूचित जाती महिला
२. अनुसूचित जमाती (एस्टी) आणि अनुसूचित जमाती महिला
३. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि ओबीसी महिला
४. सर्वसाधारण महिला
५. खुला प्रवर्ग
अनेकांसाठी हा दिवस निवडणुकीच्या निकालापेक्षाही मोठा मानला जात आहे. जर एखादी जागा खुला प्रवर्ग म्हणून घोषित झाली, तर तेथील चुरस टोकाला जाईल; मात्र जर पद महिला प्रवर्गासाठी राखीव झाले, तर दिग्गज पुरुष नेत्यांना माघार घ्यावी लागू शकते.

भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !