
पुणे – पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याविषयी मी सर्व पुणेकरांचे आभार मानतो. पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी दायित्वाने काम करू, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे निवडणूक प्रमुख खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याशी संबंधित अनेक प्रश्न शासनदरबारी मार्गी लावले. मागील ५ वर्षांत महानगरपालिकेत असतांना भाजपने केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्ष २०४७ पर्यंतचा पुण्याचा विकास कसा करायचा ? याचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन पुणेकरांसमोर मांडले. हे विचार पुणेकरांना पटल्याने त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवला.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !