
सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – भारतीय सैन्यदलातील सैनिक विकास विठ्ठल गावडे (वय २८ वर्षे) हे सुदान येथे शांती सेनेच्या माध्यमातून कर्तव्यावर असतांना हुतात्मा झाले. हे वृत्त समजताच बरड आणि पंचक्रोशी यांसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
हुतात्मा सैनिक विकास गावडे यांचा जन्म डिसेंबर १९९७ मध्ये झाला. वर्ष २०१६ मध्ये ते सैन्य दलामध्ये भरती झाले. खडकी, पुणे येथील ‘बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप’ येथे १ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लेह-लडाख, जम्मू-कश्मीर, राजस्थान, पुणे, देहली येथे ८ वर्षे नाईक या पदावर सेवा केली. शांती सेनेच्या माध्यमातून यु.एन्. मिशन दक्षिण आफ्रिका (सुदान) येथे कर्तव्यावर असतांना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, कन्या आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट