पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ५ दिवस चालणार्या या अधिवेशनाला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ होणार आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत. पहिल्या दिवशी केवळ राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, चिंबल येथील युनिटी मॉलच्या विरोधातील आंदोलन, हडफडे येथील नाईट क्लबला लागलेल्या आग दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू होणे, निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखाली ‘गोवा वाचवा’ अशी मागणी करून नगरनियोजन कायद्यातील कलम १७ (२) आणि ३९ (अ) रहित करण्याची केली जात असलेली मागणी आदी अनेक सूत्रांवर अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी संसदेत चर्चा झाल्यानंतर आता गोवा विधानसभेत त्यावर चर्चा होणार आहे.

थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !