कारागृहरक्षक सेवेतून निलंबित

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कारागृहरक्षक लक्ष्मण पाडलोसकर यांना १० जानेवारी या दिवशी गोवा कारागृह प्रशासनाने सेवेतून निलंबित केले आहे. संबंधित कारागृहरक्षक कुख्यात गुन्हेगार अमोघ नाईक याला जामीन संमत झाल्याचा आनंद साजरा करतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यामुळे कारागृह प्रशासनातील शिस्त आणि आचारसंहिता यांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक (कारागृह) सुचेता देसाई यांनी निलंबनाची पुष्टी करतांना या प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात भ्रमणभाष संच आणि इतर प्रतिबंधित वस्तू उपलब्ध असल्याच्या आरोपांवरून तीव्र चिंता व्यक्त केली होती. ही घटना ताजी असतांनाच कारागृहरक्षक कुख्यात गुन्हेगारांसमवेत जामीन संमत झाल्याचा आनंद साजरा करत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोलवाळ कारागृहात भ्रमणभाष जॅमर, सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश
कोलवाळ कारागृहात भ्रमणभाष जॅमर, सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश
पणजी – एका १२ वर्षीय मुलाच्या हत्येच्या प्रकरणी संशयिताने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून तक्रारदाराला भ्रमणभाषवर संपर्क साधून धमकी दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नुकतीच गंभीर नोंद घेत कारागृह प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत, तसेच कारागृहातील भ्रमणभाष, चार्र्जिंगची सुविधा, अमली पदार्थ आणि इतर प्रकार रोखणे यांसाठी भ्रमणभाष जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, कारागृह निरीक्षण यंत्रणा सिद्ध करणे, अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी कारागृह उपअधीक्षकांना २० जानेवारीपूर्वी कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती श्रीराम सिरसाट यांनी नुकतेच दिले आहेत.
डिचोली भागात २१ डिसेंबर २०२४ या दिवशी ही हत्या झाली होती. या प्रकरणी संशयित चंदू पाटील याला मालकाने कामावरून काढले होते.
त्या रागातून संशयित चंदू पाटील याने सहकारी अर्शद अली याच्या १२ वर्षीय भावाची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात चालू होती. संशयित चंदू पाटील याने बाल न्यायालयात जामीनअर्ज प्रविष्ट (दाखल) केला होता. या वेळी तक्रारदाराने न्यायालयात ‘संशयित चंदू पाटील मला कारागृहातून भ्रमणभाषवरून संपर्क करून धमकी देत आहे’, अशी माहिती लेखी स्वरूपात दिली होती. यामध्ये भ्रमणभाष क्रमांक, संपर्क केलेल्या दिवसाचा दिनांक आणि वेळ यांचीही माहिती होती. त्यानंतर कारागृह उपअधीक्षकांनी संशयित चंदू पाटील याच्या कोठडीतून भ्रमणभाष संच कह्यात घेतल्याची आणि चंदू पाटील याचे विशेषाधिकार बंद केल्याची माहिती देऊन त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्याचे न्यायालयाला सांगितले होते. बाल न्यायालयाने संशयित चंदू पाटील याचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाकडे आले. सुनावणीच्या वेळी चंदू पाटील याच्या विरोधातील तक्रारी, तसेच त्याने कारागृहातून तक्रारदाराला संपर्क केल्याची माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. कारागृह प्रशासनाच्या ढिलाईमुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक