
सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – येथे आयोजित करण्यात आलेले ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून, तसेच देश-विदेशातून १० लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास भेट दिली असून ८ कोटी ७२ लाख रुपयांची ग्रंथविक्री झाली. ग्रंथदालनाचे वेगळेपण म्हणजे ग्रंथ आणि ग्रंथ खरेदीसाठी येणारे साहित्य रसिक २५ कोटी रुपयांचा, तर फर्निचर आणि इतर साहित्य यांचा ४ कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला. संमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात ग्रंथ, ग्रंथ दालन आणि ग्रंथ खरेदीसाठी येणारे साहित्यप्रेमी यांचा विमा उतरवणारे हे पहिलेच संमेलन ठरले, अशी माहिती ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
7‘नियोजनाअभावी संमेलनात ग्रंथविक्री होत नाही’, अशी तक्रार अनेक वर्षांपासून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते करत होते. यंदा तोडगा काढण्यात आल्याने तो यशस्वीही झाला. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येक जण ग्रंथ दालनातूनच ये-जा करत होता.
बालवाङ्मयापासून आध्यात्मिक ग्रंथ, ऐतिहासिक कादंबर्या, कथा, कविता, समीक्षात्मक ग्रंथांसमवेतच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे, अशी माहिती ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळा’च्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिली.
| १. श्री. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य : महामंडळसंमेलनातून दूर गेलेल्या रसिकांना सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहित्याच्या मांडवात आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. शतकपूर्व संमेलन वाचककेंद्री, साहित्यकेंद्री आणि पुस्तककेंद्री व्हावे, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. संमेलनास मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पहाता या संमेलनाची स्पंदने सातारच्या मातीत दीर्घकाळ रेंगाळत रहातील आणि यातून अनेक नवीन साहित्यिक निर्माण होतील, असा विश्वास आहे.
२. श्री. विनोद कुलकर्णी , कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य : महामंडळसातारा नगरीला जशी ऐतिहासिक परंपरा आहे, त्याप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यात साहित्यप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने आहेत. शतकपूर्व संमेलन साहित्यप्रेमींच्या सहभागातून व्हावे, यासाठी जे प्रथमपासून प्रयत्न चालू होते ते विद्यार्थ्यांसाठी, साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद पहाता यशस्वी ठरले आहेत. |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक