सहस्रो लिटर पाणी वाया

बेळगाव – बेळगाव आणि बागलकोट या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या कृष्णा नदीवरील अथणीजवळ असलेल्या हिप्परगी जलाशयाचे एक द्वार ८ जानेवारी या दिवशी सकाळी मोडले. यामुळे सहस्रो लिटर पाणी वाया गेले. घटनास्थळी पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
बागलकोट जिल्हापालक आणि अबकारी खात्याचे मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांनी हिप्परगीला भेट देऊन पहाणी केली. त्वरित दुरुस्ती करून नवे द्वार बसवण्याची सूचना त्यांनी अधिकार्यांना केली. हिप्परगी जलाशयाची एकूण क्षमता ६ ‘टी.एम्.सी.’ आहे. बेळगाव अन् बागलकोट या जिल्ह्यांतील प्रमुख शहरे आणि गावे यांसाठी हे जलाशय शेती अन् पिण्याचे पाणी यांसाठी वरदान ठरले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक