शतचंडी यागाला प्रारंभ !
तुळजापूर (धाराशिव) – श्रीक्षेत्र तुळजापूर येथे पौष शुक्ल चतुर्दशी, शुक्रवार, २ जानेवारी २०२६ या दिवशी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची ‘महिषासुरमर्दिनी’ अलंकार महापूजा मोठ्या भक्तीभावाने साकारण्यात आली. २ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ झाली असून या शुभ पर्वावर मंदिर परिसरात विशेष ‘शतचंडी होमहवनास’ प्रारंभ झाला. साक्षात् पार्वती स्वरूप असणार्या जगदंबा मातेने दैत्यराज महिषासुराचा वध करून धर्माची स्थापना केली होती, याच विजयाचे प्रतीक म्हणून देवीची ही विशेष अलंकार पूजा बांधली जाते.
आदिशक्तीच्या या तेजोमय आणि पराक्रमी रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या आरंभीला आणि पौर्णिमेच्या निमित्ताने होणार्या या महापूजेचे अन् शतचंडी यागाचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण असून सर्व भाविकांनी या मंगल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान