
तुळजापूर – श्री क्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य जलयात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. पापनाश तीर्थ कुंडातून प्रारंभ झालेल्या या जलयात्रेत शेकडो महिला भक्तांनी डोक्यावर पवित्र जलकलश घेऊन भक्तीभावाने सहभाग घेतला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात निघालेली मिरवणूक तुळजाभवानी मंदिरात पोचून विधीवत् जलअर्पण करण्यात आले. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरीदेवीच्या प्रतिमेची भाजीपाला आणि फळे यांनी केलेली आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

या सोहळ्यात गोंधळी, आराधी, पुजारी मंडळ, मंदिर संस्थानचे अधिकारी-कर्मचारी, तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाकंभरी नवरात्रोत्सवातील हा पवित्र सोहळा उत्साहात पार पडला.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !