पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशमंत्री या दायित्वासाठी निर्वाचन प्रक्रिया पुणे येथील अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून प्राध्यापक (डॉ.) शांतीनाथ बागेवाडी आणि प्रदेशमंत्री म्हणून अथर्व कुलकर्णी यांचे पुनर्निर्वाचन करण्यात आले आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविपचे पूर्व प्रदेश उपाध्यक्ष प्रा. अरुण लेले यांनी निर्वाचन प्रक्रिया करतांना सांगितले की, दोन्ही पुनर्निर्वाचित पदाधिकारी नाशिक येथे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या ६० व्या हिरक महोत्सवी अधिवेशनात कार्यभार स्वीकारतील.
प्राध्यापक (डॉ.) शांतीनाथ बागेवाडी हे सध्या ‘शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर’ येथे उपप्राचार्य या पदावर कार्यरत आहेत, तर अथर्व कुलकर्णी हे मूळ विदर्भातील अकोला जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण विज्ञान शाखेत जैवतंत्रज्ञान आणि विधी शाखेत पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे.


संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !