
कोल्हापूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – २५ डिसेंबरपासून आलेल्या सलग सुट्यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरश: जनसागर उसळला आहे. २४ डिसेंबरपासून ५ दिवसांत ८ लाख ७० सहस्र भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. यात २६ डिसेंबरला २ लाख ३७ सहस्र भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्येही कधी इतकी गर्दी झाली नव्हती ! २८ डिसेंबरला पहाटे मंदिर उघडण्याच्या पूर्वीपासूनच लांबलचक रांग होती. भाविक आणि पर्यटक यांमुळे कोल्हापूर शहर गजबजून गेले होते. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, तसेच गगनबावडा-पन्हाळा, विशाळगड येथेही भाविक-पर्यटक यांची गर्दी दिसून आली. ५ जानेवारीपर्यंत ही गर्दी कायम राहील, असा कयास आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !