शाकंभरी नवरात्रोत्सवातील विशेष आकर्षण !

तुळजापूर – २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत श्री तुळजाभवानीदेवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ‘ड्रोन शो’ आता २ जानेवारी २०२६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे.

या ‘ड्रोन शो’मध्ये ३०० ड्रोनच्या साहाय्याने आकाशात तुळजाभवानी मंदिर, श्री तुळजाभवानीदेवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार असून त्यामध्ये श्री तुळजाभवानीदेवीची भव्य प्रतिकृती हे मुख्य आकर्षण असणार आहे.
यासोबतच धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्वरूपाच्या अन्य प्रतिकृतीही आकाशात झळकणार आहेत. अशा प्रकारचा ‘ड्रोन शो’ धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या भव्य ‘ड्रोन शो’चा आनंद घेण्यासाठी भाविकांनी, तसेच धाराशिव जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने करण्यात येत आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !