कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे स्पष्टीकरण

नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – तारापूर (जिल्हा पालघर) ‘मेडली फार्मास्युटिकल्स औषध’ आस्थापनात मानवी चुकीमुळे अपघात होऊन ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी आस्थापनाच्या व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून ‘मे. मेडली फार्मास्युटिकल्स’ची अनुमती रहित करण्यात आल्याची माहिती कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी भाजपचे अधिवक्ता निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.
मंत्री फुंडकर म्हणाले, ‘‘या घटनेत ४ मृत कामगारांपैकी कल्पेश राऊत यांच्या वारसास १३ लाख १६ सहस्र ५५० रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित ३ मृत कामगार हे राज्य कामगार विमा योजनेंतर्गत नोंदणीकृत असून या ३ मृत कामगारांच्या वारसांना वेतन मिळण्याविषयीचा दावा कारखाना व्यवस्थापनाने ‘इ.एस्.आय.सी.’कडे दाखल केलेला आहे.’’
कारखाना व्यवस्थापनाकडून सर्व मृत कामगारांच्या वारसांना २२ लाख ५० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. या भागात असे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तारापूर, पालघर भागांतील अशा रसायन कारखान्यांचे ‘विशेष सर्वेक्षण’ १ महिन्यात करून त्रुटी आढळल्यास त्यांना नोटिसा देण्यात येतील.
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे