सदस्य भास्कर जाधव यांची तीव्र नापंसती !

नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) – सभागृहात सकाळी १० वाजता लक्षवेधी सूचनेला प्रारंभ झाला; मात्र अतीवृष्टीच्या विषयांवरील लक्षवेधीच्या उत्तराची प्रत विरोधी सदस्यांना उपलब्धच झालेली नव्हती, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ३२ गावांना पुराचा धोका असल्याची लक्षवेधी आल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्रीच उपस्थित नव्हते. त्यामुळे या दोन्ही लक्षवेधी प्रलंबित ठेवण्याची नामुष्की तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांच्यावर आली.
१० डिसेंबर या दिवशी कामकाजात ६ लक्षवेधी दाखवण्यात आल्या होत्या. अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्याने शेतकर्यांना शासनाकडून साहाय्य मिळण्याविषयीची तिसरी महत्त्वाची लक्षवेधी होती. २९ जिल्ह्यांत ३०० हून अधिक तालुक्यांत अतीवृष्टी आणि पुरांमुळे ६८ लाख हेक्टर शेती प्रभावित झालेली आहे. त्यामुळे ६५ लाखांहून अधिक शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे. शासनाकडून तुटपूंजे साहाय्य मिळत आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ घोषित करून शेतकर्यांना साहाय्य करावे, अशी मागणी सदस्य भास्कर जाधव यांसह इतर विरोधी सदस्यांनी केली होती. ही लक्षवेधी झाली असती, तर कृषी क्षेत्राला दिलासा मिळाला असता.
परिणामी जाधव यांनी तीव्र नापंसती व्यक्त केली. त्यावर मंत्री उदय सामंत यांनीही ‘उत्तरच नसणे हे योग्य नव्हे’, या शब्दात खेद व्यक्त केला.
लक्षवेधी असली की, सभागृहाची विशेष बैठक बोलावली जाते. सभागृहाची ‘विशेष बैठक’ असूनही ६ पैकी ३ लक्षवेधी न होणे हेही ‘विशेष’ घडले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !