‘ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म’ ‘विंजो’च्या २ संस्थापकांना अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने ५०५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली !

(ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे ऑनलाईन खेळ खेळण्यासाठी सेवा देणारे माध्यम)

सौम्या सिंह आणि पवन नंदा

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने ‘ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म’ असलेल्या ‘विंजो’ आस्थापनाचे संस्थापक पवन नंदा आणि सौम्या सिंह यांना ‘मनी लाँडरिंग’च्या आरोपाखाली अटक केली आहे. ‘विंजो’कडे असलेली एकूण ५०५ कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. मनी लाँडरिंग म्हणजे काळ्या पैशाला पांढरा करण्याची प्रक्रिया.

या आस्थापनाने ४३ कोटी रुपयांची खेळाडूंची रक्कम रोखून ठेवली होती. ही रक्कम देशात ‘रियल मनी गेमिंग’वर बंदी घातल्यानंतर खेळाडूंना परत करायची होती. आरोपींना बेंगळुरूच्या स्थानिक न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.