|

पणजी, २६ नोव्हेंबर – १ रुपयात गोव्यातील मुलींशी बोलता येणार्या आणि गोव्याची प्रतिमा मलिन करणार्या ‘ॲप’वर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्याकडे केली आहे. या वेळी रणरागिणीच्या शिष्टमंडळामध्ये सौ. राजश्री गडेकर, सौ. शुभा सावंत, सौ. मोहना नाईक, सौ. रसिका दळवी आणि सौ. मानसी चोडणकर त्यांच्या समावेश होता.
या ‘ॲप’च्या विज्ञापनामध्ये ‘नवीन ‘ॲप’ डाऊनलोड करा आणि केवळ १ रुपया देऊन ‘हॉट’ आणि ‘तिखट’ मुलींशी चर्चा करा’, असे म्हटले आहे. या ॲपमुळे गोव्यातील मुली आणि महिला यांच्या प्रतिमेला ठेच पोचली आहे. यातून अश्लीलतेला सार्वजनिकरित्या प्रोत्साहन दिले जात आहे. युवावर्ग नासवला जात आहे. नैतिकदृष्ट्या हा प्रकार गंभीर आहे. यामुळे गोव्यातील मुली आणि महिला यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. परशुरामभूमीला भोगभूमी बनवण्याचे हे एक षड्यंत्र आहे. सरकार गोव्याची ‘सन, सी अँड सँड’ (समुद्रकिनारे) ही ओळख पालटून ती आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी कृतीशील असतांना अशा ॲपचा प्रसार होणे; म्हणजे सरकारच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रकार आहे.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांनी कारवाईला प्रारंभ केल्याची माहिती रणरागिणीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !