‘अकोला चॅरिटी बार असोसिएशन’चे मुख्यमंत्र्यांना पत्र

अकोला – ‘अकोला चॅरिटी बार असोसिएशन’ने मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहून गुजरात आणि कर्नाटक यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी अधिग्रहण कायदा) तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. देवस्थानच्या भूमी भूमाफियांनी हडपल्यामुळे केवळ धार्मिक संस्थांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धास्थानांची हानी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दखलपात्र आणि अजामीनपात्र असा कठोर कायदा करण्याची वेळ आल्याचे अधिवक्त्यांनी नमूद केले. सनातनच्या साधक अधिवक्त्या श्रीमती श्रुती भट आणि त्यांच्या सहकारी अधिवक्त्यांनी अकोला जिल्हा न्यायालयात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात येणार्या निवेदनावर स्वाक्षरी मोहीम राबवली. या निवेदनावर १५० हून अधिक अधिवक्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षर्या केल्या.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद