सोलापूर येथे १९ नोव्हेंबर या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचा २६ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सोहळ्याला अनोखे वलय प्राप्त झाले होते. रसिक सभागृहातील तो दिवस केवळ एका वृत्तपत्राचा वर्धापनदिन नव्हता, तर तो राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या एका पवित्र निश्चयाचा जागर होता !

१. सोहळ्यामुळे देशाला विश्वगुरु करण्याचा सामूहिक संकल्प दृढ !
सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले, ते सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वातीताई खाडयेे यांचे तेजस्वी मार्गदर्शन आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचे विचारधन ! या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी मला ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून सन्मानाने आमंत्रित करण्यात आले होते.

सोहळ्याला उपस्थित असलेला प्रत्येक वाचक आणि हितचिंतक यांच्या डोळ्यांमध्ये तीव्र तळमळ स्पष्ट दिसत होती. राष्ट्र आणि धर्म प्रसाराचे कार्य करण्याची त्यांची आंतरिक इच्छा त्यांनी आपल्या निश्चयातून व्यक्त केली. हा उत्साह पाहून मन भरून आले आणि देशाला पुन्हा एकदा विश्वगुरु करण्याचा सामूहिक संकल्प अधिक दृढ झाला !
२. सोलापूर येथील प्रवास म्हणजे विचारांचा ज्ञानयोगच !
सोलापूरपर्यंतचा माझा प्रवास अविस्मरणीय ठरला. साधक श्री. चेतन देशमाने मला समवेत नेण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत केलेला सोलापूरला जाण्याचा आणि परत पुण्याला येण्याचा प्रवास हा केवळ शरिराचा प्रवास नव्हे, तर विचारांचा ज्ञानयोग होता !
३. आपलेपणाने केलेले स्वागत !
सोलापूरला पोचल्यावर माझे झालेले स्वागत केवळ औपचारिक नव्हते, तर ते आपलेपणाचे आणि भक्तीपूर्ण होते. श्री. राजन बुणगे आणि श्री. हिरालाल तिवारी यांनी अत्यंत तत्परतेने माझे स्वागत केले. निवासस्थानाची व्यवस्थाही इतकी उत्तम होती की, जणू आपण घरीच आहोत, असे वाटत होते.
४. अलौकिक आणि सात्त्विक जेवणाचा लाभ !
या भेटीतील सर्वांत गोड आठवण म्हणजे तेथील साधिकांनी बनवलेले भोजन आणि अल्पाहार ! सर्वच पदार्थ स्वादिष्ट होते. ज्या पवित्र भावाने भोजन बनवले होते, त्या सर्व महिला साधकांचे मी अश्रूपूर्ण आभार मानतो. असे अलौकिक आणि सात्त्विक जेवण मी खरोखरच अल्प वेळा घेतले आहे.
५. सोहळ्याची सिद्धता अत्यंत सूक्ष्म आणि नियोजनबद्ध होती. सर्वच स्तरांवरील सादरीकरण निर्विघ्नरित्या पार पडले. त्यांच्या तत्परतेविषयी धन्यवाद !
सनातन संस्थेच्या साधकांविषयी कौतुकोद्गार !
हा सोहळा यशस्वी करण्यात अनेक साधकांनी पडद्याआड राहून वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. त्यांच्या निःस्वार्थ सेवेचे मी विशेष कौतुक करतो. सनातनचे साधक ज्या प्रकारे देश आणि धर्म यांसाठी कार्य करतात, ते पाहून असे काम करण्याची तीव्र इच्छा होते.
भारतात धर्मरक्षण आणि देशरक्षण यांचे कार्य अधिक मजबुतीने उभे राहील !
मला निश्चिती आहे, ‘या सोहळ्यानंतर साधकांची संख्या वाढेल.’ ‘सनातन प्रभात’चा खप वाढेल आणि कार्यही अधिक व्यापक होईल. त्यामुळे भारतात धर्म आणि देश रक्षण यांचे कार्य अधिक मजबुतीने उभे राहील.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
६. सूत्रसंचालन अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत झाले. त्यामुळे सोहळ्यात उत्सवाचे चैतन्य निर्माण केले.

७. अजय केळकर यांचे प्रेरक भाषण !
श्री. अजय केळकर यांनी ‘सनातन प्रभात’ने २६ वर्षांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांवर कशी मात केली आणि कशी प्रगती साधली, याचा प्रेरक प्रवास सांगितला. येणार्या काळात ‘हे दैनिक अधिक उंची गाठेल’, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
८. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या भाषणातून देशासाठी कृती करण्याची मिळाली स्फूर्ती !
सद्गुरु स्वातीताई खाडये यांनी राष्ट्र-धर्म विषयांवर अत्यंत हृदयस्पर्शी आणि साध्या भाषेत मार्गदर्शन केले. देशासमोरची आव्हाने कोणती, त्यांना आपण कसे सामोरे जायचे आणि आगामी काळात कोणती भूमिका स्वीकारायची, हे त्यांनी इतक्या सहजतेने समजावले की, प्रत्येक श्रोत्याला ‘मलाही देशासाठी काहीतरी करायचे आहे’, अशी स्फूर्ती मिळाली. त्यांच्या प्रभावी भाषणामुळे अनेक युवक प्रेरित होऊन ‘सनातन प्रभात’च्या कार्यात सहभागी होऊन साधना करतील, यात शंका नाही !
९. कृतीशील नागरिकांमधील देशाप्रतीची उत्कट तळमळ !

माझ्या भाषणात मी ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर भर दिला. हे युद्ध केवळ पाकिस्तान-चीनपुरते मर्यादित नसून त्यांना साहाय्य करणार्या आंतरराष्ट्रीय शक्ती आणि देशातील त्यांचे हस्तक यांच्याविरुद्धचे आहे. हे युद्ध आपल्याला दीर्घकाळ लढायचे आहे.
मी श्रोत्यांना सांगितले की, आपल्याला मोठे यश मिळत आहे. वर्ष २०२४ मध्ये ८८, तर वर्ष २०२५ मध्ये ८९ आतंकवादी हे आतंकवादी कृत्ये करण्यापूर्वीच पकडले गेले होते. हेच आपले प्रचंड यश आहे. येणार्या काळात आव्हाने वाढणार आहेत आणि सामान्य नागरिकांची सिद्धता असणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी कान आणि डोळे उघडे ठेवून कृतीशील कसे व्हावे, याविषयी मी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साही आणि देशभक्तीने ओथंबलेला होता. सोहळा संपल्यानंतरही अनेकांनी मला बराच वेळ थांबवून प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांमधून त्यांची देशाप्रती असलेली उत्कट तळमळ स्पष्टपणे जाणवली.
१०. वक्त्याचे विचार मनापासून ऐकणारे प्रेक्षक !
थोडक्यात सांगायचे, तर हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि मंगलमय वातावरणात पार पडला. ४५० हून अधिक प्रेक्षक उत्साहाने तेथे उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक वक्त्याचे विचार मनापासून ऐकले. त्यांच्या या सक्रीय सहभागाविषयी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच !
११. सोलापूरची भेट राष्ट्र-धर्मासाठी ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरली !
सोलापूरची ही भेट केवळ अविस्मरणीय नाही, तर ती राष्ट्र-धर्मासाठी ऊर्जा आणि कृतीची प्रेरणा देणारी ठरली. आपण सगळे ‘कृतीशील नागरिक’ झाल्यास भारताला सुरक्षित करण्याच्या आपल्या भूमिकेत नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !