
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५५ व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज आणि पंढरपूरचा पांडुरंग यांचा पायी पालखी सोहळा ५ नोव्हेंबरला आळंदीकडे रवाना झाला. ९ नोव्हेंबरला या पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्याच्या परिसरात नीरा (ता. पुरंदर) येथे स्वागत करण्यात आले. यापूर्वी नीरा येथील दत्तघाटावर सकाळी ११ वाजता संत नामदेव महाराज आणि ११.३० मिनिटांनी पांडुरंगाच्या पादुकांना विठ्ठलाच्या गजरात स्नान घालण्यात आले. वर्ष २०१४ पासून या पायी पालखी सोहळ्यास आरंभ झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील साडेपाच सहस्र वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. या वर्षी पांडुरंगाच्या रथाच्या पालखीत एकूण ५१ दिंड्या असल्याची माहिती सोहळा प्रमुख विठ्ठल (दादा) वासकर यांनी दिली. संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात ५० दिंड्या असून नामदेव महाराजांचे वंशज उपस्थित होते.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !