सोलापूर येथे खासगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित ! – प्रादेशिक परिवहन कार्यालय

सोलापूर  – दिवाळी काळात प्रवाशांकडून अधिक भाडे आकारले जाण्याच्या तक्रारींचा विचार करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी खासगी कंत्राटी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या सध्या भाडे दरांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक दर खासगी कंत्राटी वाहनांसाठी आकारता येणार नाहीत, असा आदेश देण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्येक ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रतिआसन दरपत्रक आणि ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवाशांना अन्यायकारक भाडे आकारणीसंबंधी तक्रारी नोंदवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा ‘टोल फ्री’ क्रमांक ९४२०५६४५१३ वर संपर्क साधावा, असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.