
पुणे – शहरातील मध्यवर्ती भागासह कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) येथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका आणि कटक मंडळ प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही ? असा प्रश्न नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत ‘अखिल भारतीय मजदूर काँग्रेस’ने प्रशासनाला केला आहे. संघटनेचे नेते डॉ. अनुपम बेगी यांनी रस्त्याच्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच रस्त्यावरील अपघातांचे दायित्व स्वीकारून प्रशासनाने नागरिकांकडून ३ महिन्यांचा कर न घेण्याची मागणी केली आहे. संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. (नागरिकांना रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी प्रशासनाला करावी लागते, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक)
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू