परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची सयुक्त राष्ट्रांवर टीका

नवी देहली – संयुक्त राष्ट्रे अजूनही १९४५च्या काळाचेच प्रतिबिंब दर्शवतात. विकसनशील देशांचा आवाज बुलंद करणे, हेच संयुक्त राष्ट्रांच्या विश्वासार्हतेचे खरे मोजमाप आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी येथे बोलतांना स्पष्ट केले. देहलीत नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांसाठी सैनिक पाठवणार्या देशांच्या परिषदेत ते बोलत होते. परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली.
🌍 “UN Needs an Update, Not a Tribute to 1945” – S. Jaishankar 🇮🇳
At the UN Peacekeeping Conference in Delhi, EAM @DrSJaishankar said:
🗣️ The UN is still stuck in 1945; it must evolve to reflect today’s world.
🌏 Its credibility depends on amplifying voices of developing… pic.twitter.com/1udYUbBFqP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2025
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर पुढे म्हणाले,
१. ज्या संस्था काळानुरूप पालट घडवू शकत नाहीत, त्या कालबाह्य होण्याचा धोका असतो. संयुक्त राष्ट्रे प्रभावी करायची असतील, तर त्यात सुधारणा करावी लागेल. संयुक्त राष्ट्रांना अधिक समावेशक, लोकशाहीप्रधान आणि आजच्या जगाचे प्रतिनिधित्व करणारे बनवावे लागेल.
२. संयुक्त राष्ट्रांतील सदस्य देशही पालटाची अपेक्षा करत आहेत. सुरक्षा परिषदेचा विस्तार होणेही आवश्यक आहे.
३. आमचे शांतता सैनिक बलवान दल आहे. मानवी साहाय्य पोचवण्यासाठी हे शूर पुत्र आणि कन्या त्यांचे प्राण धोक्यात घालतात. आज मी त्या ४ सहस्रांहून अधिक शांतता सैनिकांचे स्मरण करतो, ज्यांनी सर्वोच्च बलीदान दिले.
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !