
मुंबई – येथे ३ जून या दिवशी पडलेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, वांद्रे, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मीरा रोड आणि मरीन ड्राइव्ह परिसरात पुष्कळ पाऊस पडला. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने सकाळी ७.४० वाजता तेथील वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने पाणी उपसल्याने ४५ मिनिटांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.
बर्याच ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी सामाजिक माध्यमांवर वाहतूक व्यवस्थापनाविषयी खेद व्यक्त केला. पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर-वडाळा बोगद्याबाहेर पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरून चारचाकी घसून ती कठड्याला धडकली. यामुळे काही काळ वाहतूक संथ झाली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !