‘आर्टिकल ३७०’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते !

कर्णावती, १२ ऑक्टोबर – कर्णावती येथील कार्यक्रमात १२ ऑक्टोबरला वर्ष २०२५ साठीच्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी फोंडा, गोवा येथील श्री. आदित्य जांभळे यांना ‘फिल्मफेअर’चा ‘पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जम्मू-काश्मीरला लागू असलेले ३७० कलम मोदी शासनाने रहित केल्यानंतर त्याबद्दल माहिती देणार्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार जांभळे यांना प्रदान करण्यात आला. ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळणारे ते गोव्यातील पहिले कलाकार ठरले आहेत.
कोण आहेत आदित्य जांभळे ?
श्री. आदित्य जांभळे हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंगमधील पदवीधर असून त्यांनी गोव्यात नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द चालू केली. त्यांना वर्ष २०१६ मध्ये ‘आबा ऐकताय ना ?’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांच्या ‘खरवस’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘अमृतसर जंक्शन’ या त्यांच्या तिसर्या लघुपटाच्या वेळी त्यांना ‘उरी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसह काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !