
पुणे – पुणे विद्यापिठाशी संलग्न असलेल्या १४१ महाविद्यालयांची माहिती अद्ययावत् होत नसल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात विद्यापिठाने नियुक्त केलेल्या समितीने पडताळणी केली असता, त्यातील ४९ महाविद्यालये अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी विद्यापिठाच्या अधिसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली. अधिसभा सदस्य युवराज नरवडे यांनी पडताळणी समितीचे सदस्य महाविद्यालयांमध्ये न जाताच परस्पर अहवाल देत असल्याची तक्रार मांडली. त्या वेळी समिती पडताळणीसाठी न गेल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही काळकर यांनी नमूद केले. पुढील ३ महिन्यांत २०० ते २५० महाविद्यालयांच्या माहितीची पडताळणी करण्यात येईल. राज्य सरकारने ओला दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास परीक्षा शुल्क माफी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत व्यक्तीची नेमणूक अधिष्ठाता पदावर केली असल्याच्या तक्रारीवर कायदेशीर गोष्टी पडताळून कार्यवाही करण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअस्तित्वात नसलेली महाविद्यालये आणि त्यांच्या प्रशासनावर काय कारवाई होणार ? तेथे कार्यरत असणारे शिक्षक, त्यांचे वेतन, विद्यार्थी या संदर्भातील माहिती ही विद्यापिठाने पारदर्शकपणे सांगावी ! |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव