जगातील पहिले विद्यापीठ असलेले तक्षशिला ही भारताचीच देणगी !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – संस्कृत ही दिव्य ज्ञानाची भाषा आहे. भविष्यात संस्कृतच जगाला जोडणारी भाषा ठरेल. संस्कृतमुळे परस्परांच्या संस्कृतींशी जवळीक तर निर्माण होईलच; पण विश्वकल्याणाचा मार्गही सापडेल, असे उद्गार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे काढले. वाराणसी येथे ‘अन्नपूर्णा ट्रस्ट’च्या वतीने आयोजित शिवणकाम, भरतकाम आणि संगणक प्रशिक्षण केंद्राच्या १४ व्या समारोप समारंभात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २५० मुला-मुलींना शिवणयंत्रे आणि लॅपटॉप यांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला ही भारताचीच देणगी आहे. या विद्यापिठातून पाणिनीसारखे विद्वान निर्माण झाले. महर्षि वाल्मीकि यांनी जगातील पहिले संस्कृत महाकाव्य रचले. संस्कृतचा प्रसार व्हावा, यासाठी शासन शिष्यवृत्तीसह उच्चस्तरीय संशोधनासाठीही सातत्याने प्रयत्न करत आहे. (शालेय अभ्यासक्रमात संस्कृत भाषा समाविष्ट करणे आणि ती शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करणे , यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे ! – संपादक) आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य अभियान यांच्या माध्यमातून सरकार महिलांना स्वावलंबी बनवत असून त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठीचे प्रयत्नरत आहे.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक