सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीची सांगता !

सांगली – पश्चिमात्य आणि डाव्या विचारसरणीचे तथाकथित हिंदू हे पुरोगामित्व आणि सुधारणावाद यांच्या नावाखाली देशाचे शत्रू बनले आहेत. आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकतेचे लोक यांना धडा शिकवायचा आहे. यासाठीच धारकर्यांचा जन्म झाला आहे. हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दसर्याच्या दिवशी श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात केले.

राष्ट्रोद्धाराचे कार्य करण्यासाठीच हिंदूंचा जन्म झाला आहे !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर जीवनभर स्वत:च्या आयुष्याचा क्षण न् क्षण स्वराज्यासाठीच वेचला. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, अनेक शत्रूंना संपवले. ते ५ पातशाह्यांना पुरून उरले आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री भवानीमातेचे आशीर्वाद क्षणोक्षणी मिळाले. हे लक्षात घेऊन आपणही आपले सर्वस्व पणाला लावूया.
शत्रू कोण ? मित्र कोण ? आणि शत्रूबोध काय ? आपल्या राष्ट्राचा, आपल्या धर्माचा, आपल्या समाजाचा शत्रू नक्की कोण ?, याचा बोध नसलेला, अभ्यास नसलेला विचारहीन, कणाहीन असा आपला हिंदु समाज आहे. अशा समाजाला दिशा देऊन त्याला राष्ट्राच्या उद्धारासाठी सक्षम करणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गादौडीचे स्वागत आणि ध्वजाचे औक्षण !
सांगली येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गादौडीचे स्वागत करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. संपदा पाटणकर, सौ. प्रियांका कुष्टे आणि सौ. वंदना सलामवाडे यांनी ध्वजाचे औक्षण केले. या वेळी श्रीमती सरिता कुष्टे उपस्थित होत्या.

| ‘वर्ष २०२६ ची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहीम श्री लोहगड ते श्री भीमगड मार्गे राजमती गड अशी होणार आहे’, असे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घोषित केले. |
पुणे शहरात ६ दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस !
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ७ जुलैला दक्षिणद्वार सोहळा पार पडला !
राज्यातील १२ अभियांत्रिकी विद्यालये बंद होणार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात होणार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त ‘पुणे ग्रामीण’मध्ये वाहतूक पालट
पावसामुळे विविध ठिकाणी हानी !