|

वेंगुर्ला – गांधीनगर, शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाला वर्ष २०३० मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी सत्याग्रहाचे स्मारक उभारण्यात यावे आणि यासाठीची सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी शिरोडा पंचक्रोशीतील जागरूक नागरिक आणि इतिहासप्रेमी यांनी २ ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या दिवशी येथे लाक्षणिक उपोषण केले. वेंगुर्ल्याचे तहसीलदार आेंकार ओतारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ‘याविषयी जिल्हाधिकार्यांकडे पाठपुरावा करून काही दिवसांतच भूमीच्या हस्तांतरणाचा विषय मार्गी लावू’, असे आश्वासन दिले, तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनीही भ्रमणभाषवरून संपर्क करून आंदोलनाविषयीची माहिती घेतली आणि ‘लवकरच नियोजित स्मारकाच्या स्थळी भेट देणार’, असे सांगितले.
वर्ष २०२२ मध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन पार पडला. त्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी येथील ‘मिठाचा सत्याग्रह स्मारका’चा प्रश्न लवकरच मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापपर्यंत हा विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित सर्वांना जाग यावी आणि स्मारकासाठीची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, यासाठी आंदोलन केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या वेळी सर्वश्री प्रथमेश परब, संदीप गावडे, दिगंबर परब, सुनील गावडे, नारायण गावडे, राकेश परब, अमोल परब, देवेश गावडे, विशाल गावडे, गोपीनाथ राऊत, तुषार राऊत, संदीप परब आदी कार्यकर्ते उपोषणास बसले होते.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र