सन्मानामुळे ‘घरवापसी’ मोहिमेला आणखी बळकटी मिळेल ! – जुदेव
(घरवापसी म्हणजे अन्य धर्मांतून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

नवी देहली – येथील पंतप्रधान संग्रहालयात झालेल्या एका भव्य समारंभात ‘राष्ट्रीय अटल फाऊंडेशन’ या संघटनेने ‘अखिल भारतीय घरवापसी’चे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना प्रतिष्ठित ‘अटल भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जातो. या प्रसंगी जुदेव म्हणाले की, या सन्मानामुळे ‘घरवापसी’ मोहिमेला आणखी बळकटी मिळेल. यासह राष्ट्र आणि सनातन धर्म यांप्रती असलेल्या समर्पणात नवीन ऊर्जा निर्माण होईल. येणार्या काळात घरवापसीचे कार्य आणखी दृढ निश्चय आणि जोमाने पुढे नेले जाईल.
🚩@prabaljudevBJP , Akhil Bharatiya Ghar Wapsi Chief, honored with the prestigious Atal Bhushan Award by the Atal Foundation at the PM Museum, New Delhi.
The award, dedicated to Atal Bihari Vajpayee Ji’s legacy, celebrates those devoted to society, nation & Sanatan values. pic.twitter.com/hs5gUHDyyp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2025
‘राष्ट्रीय अटल फाऊंडेशन’ संघटनेचे कार्य !
‘राष्ट्रीय अटल फाऊंडेशन’ देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदर्शांचे जतन आणि प्रसार करण्याचे काम करते. युवा नेतृत्व, तसेच साहित्य आणि कविता यांना प्रोत्साहन देण्यासह सुशासन अन् विकास यांविषयी त्यांचे दृष्टीकोन जनतेपर्यंत पोचवण्यात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते.
यह उत्कृष्ट सम्मान उन अग्रणी व्यक्तियों के अथक प्रयासों पर प्रकाश डालता है जिन्होंने हमारे राष्ट्र और सनातन संस्कृति की रक्षा के लिए अपना जीवन समर्पित कर दिया है, तथा हमें उनकी उल्लेखनीय विरासत को आगे बढ़ाने के लिए प्रेरित करता है।#AtalBihariVajpayee @ShyamSJaju https://t.co/twExvJlkBs
— Prabal Pratap Singh Judev (@prabaljudevBJP) September 21, 2025
‘अटल भूषण पुरस्कार’ राष्ट्र आणि सनातन धर्म यांसाठी कार्य करणार्या सर्व महान व्यक्तींना दिला जातो, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन समाज अन् राष्ट्र यांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !