१. ‘गुरुसेवेसाठी समर्पित जीवन कसे असावे ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘गुरुसेवेसाठी समर्पित जीवन कसे असावे ?’, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ यांचे दैनंदिन जीवन !
गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विश्वव्यापक समष्टी कार्य सांभाळण्यासाठी दैवी ऊर्जाच आवश्यक आहे. हे कार्य करण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागते. सतत समष्टीचा विचार असावा लागतो. ज्यांच्यामध्ये देवत्व आहे, तेच हे दैवी कार्य करू शकतात. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये हे सर्व गुण असल्यानेच त्या गुरुदेवांचे ‘साधक घडवणे’, हे जे विश्वव्यापक कार्य आहे, ते सांभाळू शकत आहेत.
२. ‘शंखनाद महोत्सव’ म्हणजे जणू हिंदु राष्ट्राचे मोठे शिवधनुष्य श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी लीलया उचलणे

मे २०२५ मध्ये गोव्यात झालेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ही गुरुदेवांच्या विश्वव्यापक कार्याची एक ओळख होती. हा महोत्सव केवळ साधकांचा मेळावा नसून ते हिंदु राष्ट्राचे मोठे शिवधनुष्य होते आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हे शिवधनुष्य श्रीरामाप्रमाणे लीलया उचलले. गुरुदेवांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी या नात्याने त्यांच्याकडे साधकांचे दायित्व होते. सर्वत्रच्या साधकांचे दायित्व सांभाळत त्यांनी रात्रंदिवस झटत शंखनाद महोत्सवासाठी जे परिश्रम घेतले, ते मानवाच्या बौद्धिक सामर्थ्याच्या पलीकडचे होते. ‘देशावर असलेले ‘भारत-पाकिस्तान’ युद्धाचे सावट, पावसाने घातलेले थैमान आणि सीमित धनाची उपलब्धता’ आदी विविधांगी परिस्थितीला सामोरे जाऊन ‘गोव्यात आतापर्यंत झाला नाही’, असा कार्यक्रम श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गुरुभक्तीच्या बळामुळेच साधकांना पार पाडता आला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी रात्रीचा दिवस करणार्या, संपूर्ण विश्वात रामराज्याच्या स्थापनेसाठी अविरत झटणार्या आणि अंगी देवत्व असणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कोटीशः नमन !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (१४.९.२०२५)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !