
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १५ सप्टेंबर – श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरातील श्री ब्रह्मदेवाची अतीप्राचीन मूर्ती ही मे २०२५ मध्ये श्री तुळजाभवानी संस्थान आणि महाराष्ट्र पुरातत्व विभाग यांचा हलगर्जीपणा अन् निष्काळजीपणा यांमुळे भंग पावली. या संदर्भात संस्थानच्या अध्यक्षांना अनेकांनी निवेदने, तक्रारी देऊन त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. या संदर्भात तुळजापूर पोलीस ठाणे येथेही तक्रार देण्यात आली आहे. असे असतांना यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तरी श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग केल्याच्या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक तथा तहसीलदार आणि साहाय्य संचालक पुरातत्व विभाग यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे १५ सप्टेंबरपासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
या साखळी उपोषणासाठी हिंदु राष्ट्र सेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख श्री. परीक्षित साळुंखे, तुळजापूर येथील ‘भोपे पुजारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अमरराजे परमेश्वर-कदम, सचिव श्री. विनोद कदम-सोनजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख श्री. अर्जुनआप्पा साळुंखे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक श्री. सुनील नागणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर उपस्थित होते. याच समवेत श्री तुळजाभवानी युवा-भोपे पुजारी मंडळासह अनेक हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक, धार्मिक संघटनांनी प्रत्यक्ष भेटून या उपोषणास पाठिंबा दिला आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलीस कारवाई स्वत:हून का करत नाहीत ? |
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट
कळंगुट येथील ‘नाझरी रिसॉर्ट’च्या अवैध बांधकामावर कारवाई