कर्नाटकाच्या गोकर्ण देवळात पारंपरिक पोशाखात सुरक्षा कर्मचारी

पारंपरिक पोशाखात सुरक्षा कर्मचारी

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील तीर्थक्षेत्र गोकर्णच्या महाबळेश्वर देवळात गेल्या ७ वर्षांपासून भाविकांना वस्त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) अनिवार्य करण्यात आहे. आता हाच नियम सुरक्षा कर्मचार्‍यांसाठीही लागू झाला आहे. मंदिर प्रशासनाने आता सुरक्षा कर्मचार्‍यांसाठी शर्ट, धोतर आणि शाल घालण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमाची कार्यवाही नुकतीच चालू झाली आहे.