परभणी येथील शाळेत ‘वैज्ञानिक दृष्टीकोन दिन’च्या नावाखाली दाभोलकरांच्या विचारांचा प्रचार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर

परभणी – २० ऑगस्ट हा दिवस ‘भारताचा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन’ असून तो ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतीदिन’ आहे, असे शिकवले जात असल्याचा व्हिडिओ फेसबुकद्वारे प्रसारित झाला आहे. हा प्रकार ता. पाथरी, हादगाव बुद्रुक येथील ‘चैतन्य विद्यालय’ येथे घडला. या व्हिडिओत शाळेतील विद्यार्थ्यांना ‘डॉ. दाभोलकर यांना अभिवादन’ करण्यास प्रवृत्त करण्यात आले. (दाभोलकरांचे हिंदुविरोधी विचार मुलांच्या कोवळ्या मनावर रुजवण्याचा अधिकार या शाळेला कुणी दिला ? पालकांनीही याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदुविरोधी व्यक्तींचा गौरव करून मुलांच्या मनावर धर्मद्रोही संस्कार केले जात आहेत, हे गंभीर आहे. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी ! – संपादक)