
सावंतवाडी – दहीहंडीसारखा उत्सव हा हिंदु धर्माच्या दृष्टीकोनातून फारच महत्त्वाचा सण आहे. या दहीहंडीच्या निमित्ताने सर्व हिंदु बांधव एकत्र येतात. कोणतीही जात, भाषा यांचा विचार न करता केवळ हिंदु म्हणून एकत्र येऊन या हिंदु राष्ट्रामध्ये सर्वांत मोठी शक्ती ही केवळ हिंदूंचीच आहे, हे दाखवून देण्याची संधी या सणांच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे ही एकी अशाच प्रकारे नेहमीच दाखवून द्या, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले.
१६ ऑगस्ट या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातील काही दहीहंडी उत्सवांना मंत्री राणे यांनी भेट दिली. भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या वतीने येथील आर्पीडी हायस्कूलच्या पटांगणात आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला भेट दिली असता मंत्री राणे बोलत होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘‘रात्री १२ वाजेपर्यंत केवळ मुंबई आणि ठाणे येथेच दहीहंडी उत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात हे पाहिले होते; मात्र सावंतवाडी शहरात देखील रात्री उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने दहीहंडी प्रेमी उपस्थित असल्याचे पाहून आनंद वाटला.’’
याप्रसंगी व्यासपिठावर भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू