
फोंडा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – नागेशी येथील नागेश मंदिर परिसरात वर्षपद्धतीप्रमाणे भजनी सप्ताह आणि श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला, म्हणजेच दहीहंडी फोडणे हा उत्सव ९ ते १६ ऑगस्ट या कालावधीत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे नागेशी मंदिरामध्ये पूर्ण ७ दिवस भजन आणि नामसंकीर्तन चालू असते अन् गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी दहीहंडी फोडून सर्वांना प्रसाद देऊन या उत्सवाची सांगता होते. प्रारंभीचे ७ दिवस गावातील आणि आसपासच्या परिसरातील भजनी पथके त्यांची सेवा सादर करतात. या वर्षी ८ व्या दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट या दिवशी सकाळपासून नागेशी मंदिरात भजन आणि नामसंकीर्तन चालू करून दुपारी सर्वांनी गोविंदाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर गावातील सर्व वाड्यांवरील तरुण एकत्र येऊन त्यांनी नामगजराच्या जल्लोषात उंचावर बांधलेली दहीहंडी फोडली. त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी नागेशी परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते.
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !