शिमला – हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागांत मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील कोटखाईमधील टेकड्यांमध्ये ढगफुटी झाल्याने नाल्यात मातीचा ढिगारा साचला आहे. या ढगफुटीमुळे तराईमध्ये बांधलेला पेट्रोलपंप आणि ६ हून अधिक वाहने गाडली गेली. कुल्लू आणि शिमला येथेही ढगफुटी झाल्याने नद्या आणि नाले यांना पूर आला आहे. ‘हिमाचल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ घंट्यांत पावसामुळे राज्यातील ३२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या ४ जणांना सैन्याने वाचवले आहे.
उत्तरप्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये पूर : शाळा-महाविद्यालये बंद !
उत्तरप्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. हवामान खात्याने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. १३ ऑगस्टला रात्री उशिरा लक्ष्मणपुरीमध्ये मुसळधार पाऊस झाला. लक्ष्मणपुरीसह इतर पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक