
पणजी, ११ ऑगस्ट (पत्रक) – मराठी राजभाषा निर्धार समितीचा वक्ता-प्रशिक्षण वर्ग फोमेंतो सभागृह, श्री सरस्वती मंदिर, पणजी येथे प्रा. गजानन मांद्रेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १० ऑगस्टला यशस्वीरित्या पार पडला. वर्गात गोव्यातील विविध भागांतील ८१ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या वेळी समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, प्रा. गजानन मांद्रेकर, राज्य समन्वयक श्री. रामदास सावईवेरेकर, उत्तर गोवा जिल्हा युवा प्रमुख श्री. प्रणव बाणावलीकर आणि मध्य गोवा युवा प्रमुख श्री. शिवाजी वझरकर व्यासपिठावर उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर मराठी निर्धार समित्या स्थापन करण्याची मोहीम चालू झालेली असून गोव्यात सर्वत्र या स्तरांवर मराठी राजभाषेच्या संदर्भात जागृती करण्यासाठी या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना गुंतवण्यात येणार आहे. मराठी राजभाषेच्या संपूर्ण विषयाची ६ भागांत मांडणी करण्यात आल्यावर त्या संदर्भात मते आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. संदर्भासाठी लागणारे प्रारूप कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आले होते.
मराठी हा केवळ एका भाषेचा विषय नसून मराठीमुळेच पोर्तुगिजांच्या क्रूर राजवटीच्या ४५० वर्षांत गोव्याची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवणे आपल्याला शक्य झाले. त्यामुळेच संस्कृतीरक्षणासाठी मराठी राजभाषा होणे आवश्यक आहे. सर्वांचे योगदान या कामी आवश्यक आहे, असे उद्गार छोट्याशा समारोपात निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काढले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !