असीम मुनीर यांची अमेरिकेतून भारताला अणू युद्धाची दर्पाेक्ती

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही आण्विक शक्ती असलेला देश आहोत आणि जर आम्हाला वाटले की, आम्ही बुडत आहोत, तर आम्ही अर्धे जग आमच्यासमवेत घेऊन बुडू, अशी धमकी पाकिस्तानच्या सैन्यदलाचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील टाम्प शहरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पाकिस्तान वंशाचे व्यावसायिक अदनान असद यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना दिली. ‘द प्रिंट’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या कार्यक्रमाला पाकिस्तानी वंशाचे अनुमाने १२० नागरिक उपस्थित होते. या लोकांना कार्यक्रमास्थळी भ्रमणभाष नेण्यास मनाई होती आणि असीम मुनीर यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ बनवण्यासही बंदी होती. असीम मुनीर हे अमेरिकेचे निवृत्त होणारे कमांडर जनरल मायकेल कुरिल्ला यांच्या निरोप समारंभासाठी फ्लोरिडा येथे आले आहेत.
💣 Pak Army Chief’s Nuclear Bluster Exposed!
From the US, Asim Munir threatens: “If we drown, we’ll take half the world with us!” and vows missile strikes on India’s Indus dam.
But after 🇮🇳’s Operation Sindoor, his words ring hollow.
PC: @OsintUpdates pic.twitter.com/IJbeuzxMn6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 10, 2025
(म्हणे) ‘भारताने सिंधु नदीवर धरण बांधल्यावर आम्ही ते क्षेपणास्त्रे डागून नष्ट करू !’
कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी सांगितले की, आण्विक धमकीनंतर असीम मुनीर यांनी सिंधु जल वाटप कराराविषयीही भाष्य केले. ते म्हणाले की, भारताने तो स्थगित करण्याच्या निर्णयामुळे २५ कोटी लोकांना भुकेचा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही भारताने या नदीवर धरण बांधण्याची वाट पाहू आणि त्याने ते बांधताच आम्ही १० क्षेपणास्त्रे डागून ते नष्ट करू. सिंधु नदी भारतियांची वैयक्तिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही.
भारत मर्सिडीज गाडी, तर आम्ही ट्रक असून धडक दिल्यावर ती नष्ट होईल !
आम्ही भारताच्या पूर्वेकडून प्रारंभ करू, जिथे त्यांनी त्याची सर्वांत मौल्यवान साधने आहेत आणि मग पश्चिमेकडे जाऊ. भारत ही महामार्गावर धावणारी चमकदार मर्सिडीज गाडी आहे, तर आम्ही मातीने भरलेला एक ट्रक आहोत. जर ट्रक चारचाकी गाडीला धडकला, तर हानी कुणाची होईल ?
संपादकीय भूमिका
|
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !