|

दिग्रस (जिल्हा यवतमाळ) – राळेगाव येथील शितलामाता मंदिर परिसरात अतिक्रमण केलेल्या जागेत मांस विक्रीची दुकाने १५ वर्षांपासून आहेत. या व्यवसायाचा येथे बाजार सिद्ध झाला. यातील काही दुकाने मंदिराच्या भिंतीला टेकलेली आहेत. ही सर्व दुकाने मंदिरापासून ५० मीटरच्या आत असल्यामुळे मंदिर परिसरात दुर्गंध पसरतो. त्यामुळे येणार्या सर्व भाविकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही या संदर्भात स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते; परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भाविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहे. यासाठी मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि मंदिरांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे. या दृष्टीने धार्मिक स्थळांच्या परिसरात मद्य-मांस यांची विक्री होणे, हे मंदिरांचे पावित्र्य भंग करण्यासमान आहे. मांसाहार करून अथवा मद्यपान करून मंदिर परिसरात येणे, हेही अयोग्य आहे. जर या परिसरात मद्य-मांस यांची विक्री होत आहे, तर मद्यपी लोक मंदिरात शिरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अशा मद्यपींकडून मूर्तीची विटंबना होण्याचीही शक्यता वाढते. भारतीय संविधान ‘कलम २५’नुसार सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. यानुसार हिंदु धर्मात त्याज्य असे मद्य आणि मांस हिंदूंच्या धार्मिक स्थळी विक्री करण्यास अनुमती देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे होय. मंदिर परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त होणे अत्यावश्यक आहे.

या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन २३ जुलै या दिवशी नगरपंचायत मुख्याधिकारी श्री. गिरीश पारेकर, तसेच उपविभागीय अधिकारी श्री. सुधीर पाटील यांना देण्यात आले. या वेळी त्यांनी या निवेदनाची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हे निवेदन देण्यासाठी श्रीराममंदिराचे सचिव श्री. मेघश्याम चांदे, गजानन महाराज मंदिराचे श्री. सुरेश पाटील, श्री. दिलीप दुदगीकर, विठ्ठल मंदिराचे श्री. भूपेंद्र करिया, श्रीराममंदिर, वाढोणा बाजारचे सचिव श्री. भास्कर मानकर, सदस्य श्री. अरुण भरणे, कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर तुराळे, ‘श्रीराम जन्मोत्सव समिती’चे अध्यक्ष श्री. चंद्रकांत मशरू, रावेरी येथील हनुमान मंदिराचे श्री. चंद्रकांत गोहने, सावंगी येथील ‘रामचंद्र देवस्थाना’चे श्री. चंद्रशेखर ढूमने, नगरसेवक श्री. मंगेश राऊत, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राळेगाव तालुका संयोजक श्री. अनिल वर्मा, जिल्हा संयोजक श्री. भगवानजी डगवार, यवतमाळ जिल्हा संघटक श्री. दत्तात्रय फोकमारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे, यांसह अन्य मंदिरांचे पदाधिकारी आणि भक्त उपस्थित होते.
दिग्रस येथेही तहसीलदारांना निवेदन![]() याच मागणीसाठी २४ जुलै या दिवशी महासंघाकडून तहसीलदार मयूर राऊत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी निवेदनाची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हे निवेदन देण्यासाठी दिग्रस येथील मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, डॉ. मुरलीधर राठी, सर्वश्री रामदास पद्मावार, राजू कुकडे, वामन चिद्दरवार, सुधीर बसरैया, सौरभ टाक, हरीश उपलेंचवार, सतीश महाजन, कुलदीप जोशी, विजय वर्मा, गजानन मोरे उपस्थित होते. |

अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !