म्हादईवरील धरणांचे काम चालू करणार असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली माहिती

पणजी, २४ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत २१ जुलै या दिवशी ‘केंद्र सरकार कर्नाटकच्या म्हादईचे पाणी वळवण्यासाठीच्या कळसा-भंडुरा प्रकल्पांना अनुज्ञप्ती देणार नाही’, असे विधान केले होते. या विधानाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे म्हादईसंबंधी विधान हे कर्नाटकच्या जनतेचा अपमान आहे. कळसा-भंडुरा प्रकल्पांना मान्यता देणार नसल्याचे केंद्राने अजूनही का सांगितले नाही ? भाजपची काम करण्याची हीच पद्धत आहे का ? म्हादई जलवाटप तंटा लवादाने आम्हाला वर्ष २०१८ मध्ये म्हादईचे १३.४२ टी.एम्.सी. पाणी वापरण्यास अनुमती दिली आहे; मात्र केंद्र सरकार आणि गोवा सरकार हे पाणी आम्हाला वापरण्यास बंदी घालत आहे. कर्नाटक म्हादईच्या पाण्याचा न्याय्य वाटा मिळेपर्यंत कायदेशीर, राजकीय आणि नैतिक दृष्टीने लढा चालूच ठेवणार आहे.’’ उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, ‘‘म्हादईप्रश्नी कर्नाटक सरकार सर्वाेच्च न्यायालयातून अर्ज मागे घेऊन म्हादई नदीवरील कळसा-भंडुरा धरणांचे काम चालू करणार आहे. म्हादई जलवाटप तंटा लवादाच्या निवाड्याप्रमाणे आम्ही कामाच्या निविदा काढण्याची प्रक्रिया चालू केली आहे. आम्हाला कुणी थांबवू शकत नाही.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात