‘सन्मान कॅपिटल लिमिटेड’मधील निधीचा अपव्यय केल्याचे प्रकरण
नवी देहली – ‘सन्मान कॅपिटल लिमिटेड’ (पूर्वीची इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) यांच्या प्रवर्तकांनी निधीचा अपव्यय केल्याच्या गंभीर आरोपांची विशेष अन्वेषण पथकाच्या माध्यमातून न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या सुनावणीला उपस्थित न राहिल्याविषयी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआयला) फटकारले. ‘आम्ही या वर्तनाचे कौतुक करणार नाही. एकदा आम्ही ज्यांना नोटीस बजावली, त्यांना येथे यावे लागते. ते ‘सर्वोच्च न्यायालयात उपस्थित रहाणार नाहीत’, असे कसे म्हणू शकतात ? त्यांच्यात न्यायालयात येण्याचेही धाडस नाही ?, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.
या वेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी एक आठवड्याचा वेळ मागितला. न्यायालयाने तो दिला. न्यायालयाने या वेळी आठवण करून दिली की, सीबीआयला कारवाई करण्यासाठी औपचारिक तक्रारदाराची आवश्यकता नाही.

Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !