आमदार टी. राजा सिंह यांचे त्यागपत्र भाजपने स्वीकारले

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदार संघातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचे पक्षाच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र भाजपने स्वीकारले. या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्र प्रसारित करून याची माहिती दिली आहे. यावर टी. राजा सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मी जनता, देश आणि हिंदुत्व यांची सेवा करण्याच्या उद्देशाने भाजपमध्ये सहभागी झालो. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला गोशामहलमधून तीनदा तिकीट दिले, ज्यासाठी मी आभारी आहे. मी हिंदुत्वाची सेवा करण्यासाठी जन्मलो आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि सनातन धर्म यांचे रक्षण करत राहीन.
भाजपने टी.राजा यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, तुमच्या त्यागपत्रात लिहिलेल्या गोष्टी अप्रासंगिक आहेत आणि पक्षाच्या कार्यशैली, विचारसरणी अन् तत्त्व यांच्याशी जुळत नाहीत. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार तुमचे त्यागपत्र स्वीकारण्यात येत आहे.
माझा निर्णय कोणतेही पद, सत्ता किंवा वैयक्तिक स्वार्थ यांनी प्रेरित नाही !
टी. राजा सिंह यांनी त्यागपत्र संमत झाल्यावर पुढे म्हटले की, कदाचित् तेलंगाणात भाजप सरकार स्थापन करण्यासाठी दिवसरात्र काम करणार्या लाखो कार्यकर्त्यांचे दुःख मी देहलीपर्यंत पोचवू शकलो नाही; पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की, माझा निर्णय कोणतेही पद, सत्ता किंवा वैयक्तिक स्वार्थ यांनी प्रेरित नाही. समाज आणि हिंदु समाज यांच्या अधिकारांसाठी माझा आवाज नेहमीच बुलंद राहील. माझे समर्पण पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने असेल.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !