भारताने इराणची बाजू घेण्याच्या सोनिया गांधी यांच्या मागणीवर भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांचे विधान
नवी देहली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इराणच्या बाजूने ‘द हिंदू’ दैनिकात लिहिलेल्या लेखावर भारतातील इस्रायली राजदूतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजदूत रुवेन अझर यांनी म्हटले आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीचा (सोनिया गांधी यांचा) उल्लेख केला आहे, तिने ७ ऑक्टोबर २०२३ च्या आक्रमणांचा (हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणांचा) निषेध केला नाही. हे पाहून आम्हाला निराशा झाली. गेल्या ३ दशकांपासून इराण करत असलेल्या आक्रमकतेकडे दुर्लक्ष करणे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे.
सोनिया गांधी यांनी या लेखात भारताने इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात इराणची बाजू घेण्यास सांगितले होते. तसेच भारताच्या या युद्धावरील कथित मौनावरही प्रश्न उपस्थित केले होते.
संपादकीय भूमिकासोनिया गांधी यांना मुसलमानांच्या लांगूलचालनातून राजकीय स्वार्थ साधायचा असल्यानेच त्यांनी इराणची बाजू घेण्याचे आवाहन केले होते, हे भारतियांना ठाऊक आहे ! |