अमरावती, यवतमाळसह १७ ठिकाणी धाडी !

नागपूर – अकोला येथील ४ सराफा दुकानांवर आयकर विभागाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकार्यांनी धाडी घातल्या आहेत. १४ मे या दिवशी सकाळपासून ही कारवाई चालू आहे. या धाडीविषयी गोपनीयता ठेवली असल्याने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अकोला शहरातील पुनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि एकता ज्वेलर्सच्या संपूर्ण ग्रुपवर धाड घालण्यात आली. या ज्वेलर्सच्या अमरावती, यवतमाळ, परतवाडा येथील एकूण १७ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. धाडीच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. या कारवाईतील अन्वेषणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत आले होते. त्यामुळे अकोला येथील कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवरही आयकर विभागाने धाड घातली होती.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !