Donald Trump’s Kashmir Offer : काश्मीरचे सूत्र सोडवण्यासही मी सिद्ध !

डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि पाकिस्तान या दोघांसमवेत काश्मीरच्या सूत्रावर बोलण्यासही सिद्ध आहे. काश्मीरसंदर्भात सहस्रो वर्षांनंतरही काही तोडगा निघू शकतो, यावर आपण एकत्रितपणे विचार करू शकतो. देव भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वाला चांगले काम करण्याचा आशीर्वाद देवो, अशी पोस्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले आहे. यातून त्यांनी काश्मीरच्या सूत्रात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ट्रम्प यांनी युद्धविरामावर म्हटले की, जर हा संघर्ष चालूच राहिला असता, तर मोठ्या प्रमाणावर लोक मृत्यूमुखी पडले असते आणि मोठा विनाश झाला असता. लाखो चांगल्या आणि निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले असते. मला अभिमान आहे की, अमेरिका आपल्याला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोचण्यास साहाय्य करू शकली. मी या दोन्ही देशांसमवेतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.

संपादकीय भूमिका 

ट्रम्प यांना काश्मीरचे सूत्र सोडवण्यास एवढा रस का ? अमेरिकेने जागतिक स्तरावर ज्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, तेथे ती समस्या अधिक चिघळली अथवा संबंधित देशाचे वाटोळे झाले, हा इतिहास आहे. त्यामुळे भारतानेही याविषयी सावध रहाणे आवश्यक !